(Chhattisgarh) छत्तीसगड ओडिशा सीमेवर गरीयाबंदमध्ये सुरक्षारक्षक आणि (Naxalwadi) नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १४ हून अधिक माओवादी ठार झाले असून यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. (Chhattisgarh) छत्तीसगड ओडिशा सीमेवर गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत सुरक्षारक्षकांना मोठे यश आले आहे . या चकमकीत सीआरपीएफचा कमांडो बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. कोब्रा कमांडोला झालेली दुखापत किरकोळ असल्याचेही त्यांनी सांगितले . या चकमकीत एक कोटी रुपयांचे इनाम असलेला एक माओवादीही मारला गेला असल्याचे(Police) पोलिसांनी सांगितलंय .छत्तीसगडच्या कुलरीघाट राखीव जंगलात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीच्या आधारे (दि.१९) जानेवारीच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
माओवाद्यांच्या मृतांची संख्या वाढू शकते, असे अहवालात म्हटले आहे.याच ऑपरेशन दरम्यान झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार आणि एक कोब्रा जवान जखमी झाल्याची माहिती आहे, छत्तीसगड-ओडिशा सीमेवर असलेल्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी पहाटे गोळीबार झाला. यात अधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल, छत्तीसगडमधील कोब्रा आणि ओडिशातील स्पेशल ग्रुप यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक या कारवाईत सहभागी होते.