बीड दि.२० (प्रतिनिधी)-(Kaij)केज तालुक्यातील मस्साजोगमधील दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी,(Sit)एसआयटीची स्थापना केल्यानंतर न्यायालयीन समिती ही गठीत केली होती.या समितीचा कारभार बीडमधून चालणार होता.मुख्यालयाचे ठिकाण आधी बीड येथे निश्चित करण्यात आले होते.मात्र आता उपसचिव हेमंत महाजन यांनी न्यायालयीन चौकशीचे मुख्यालय हे (Mumbai)मुंबई येथे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.याबाबतचा शासन निर्णय समोर आला आहे.
मस्साजोगमधील दिवंगत (Santosh Deshmukh)संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली.या समितीचे प्रमुख म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयातील निवृत्त न्या.एम.एल.तहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली होती.तहलियानी यांच्या समितीचे कार्यालय (Beed)बीड येथे राहिलं असे स्पष्ट करण्यात आले होते.मात्र न्या.एम.एल.तहलियानी यांनी पत्राद्वारे सरकारकडे विनंती करत मुख्यालय मुंबई येथे करण्याची विनंती केली.त्यानुसार शासनाने सोमवारी हे नवीन आदेश काढले आहेत.
बातमी शेअर करा