शिरुर दि.२० (प्रतिनिधी)- (shirur)कार आणि दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज (दि.२०) रोजी सकाळी ११.४० च्या सुमारास (hivarsinga)हिवरसिंगा येथे घडली आहे. गहिनीनाथ चुडा चेपटे (वय ६५ वर्ष) रा. घुगेवाडी ता. शिरुर कासार असे अपघातातील मयताचे नाव असून, आज सोमवारी दुचाकीवरुन जाताना हिवरसिंगा येथे स्विफ्ट डिझायर आणि दुचाकीचा (accident)अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृतदेहाचे (beed) बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
बातमी शेअर करा