बीड दि.१९(प्रतिनिधी)- (Beed)पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज (दि.१९) रोजी पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता.घोडका राजुरी येथील तरुण (police)पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रनिंगची प्रॅक्टिस करत होते. याच वेळी (Beed) बीडहून परभणी कडे भरधाव वेगाने जाणारी बीड परभणी गाडीने या मुलांना जोराची धडक दिली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जणांनी वेळीच रस्त्याच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे वय २० वर्ष, विराट बब्रूवान घोडके व 19 वर्ष तसेच ओम सुग्रीव घोडके वय 20 वर्ष यांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.
बातमी शेअर करा