Advertisement

 केजरीवालांच्‍या कारवर हल्ला

प्रजापत्र | Saturday, 18/01/2025
बातमी शेअर करा

 दिल्‍ली- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पाेहचली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर भाजप उमेदवाराच्‍या गुंडांनी हल्ला केला, असा दावा आज (दि. १८) आम आदमी पक्षाने साेशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आल्‍याचा दावा आपने केला आहे. दरम्‍यान, केजरीवाल यांच्‍या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे, असा आराेप भाजपने केला आहे.

Advertisement

Advertisement