Advertisement

जमिनीच्या वादातून अंबाजोगाईत गोळीबार 

प्रजापत्र | Friday, 17/01/2025
बातमी शेअर करा

 बीड- अंबाजोगाईत हवेत गोळीबार (Firing In Beed) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता? यासाठी पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Ambajogai) अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बीड(beed) जिल्हा कायम चर्चेत आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तर काल (दि.१६) आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता अंबाजोगाईत जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Advertisement

Advertisement