Advertisement

धर... पकड... वाहतूक शाखेची बस स्टॅन्डसमोर मोहीम

प्रजापत्र | Thursday, 16/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१६ (प्रतिनिधी)- (Beed)येथील सर्वात वर्दळीचे ठिकाणी असलेल्या (Bus stand)बस स्टॅन्ड आणि अण्णाभाऊ साठे चौकात (Traffic police)वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप यांनी कारवाईची मोहीम हाती घेतल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची मोठी तारांबळ उडत आहे.मागच्या तासाभरापासून सपोनि सुभाष सानप यांची टीम रस्त्यावर उभे राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे चित्र आहे. 
        बीड (Beed)जिल्ह्यात बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सपोनि सुभाष सानप यांनी अनेक मोहीम आतापर्यंत राबविल्या आहेत.विशेष म्हणजे शेकडो बुलेटचे सायलेन्ससर काढून त्यांच्यावर रोडरोलर फिरवण्याचे काम देखील त्यांनी दोन वेळा केले.(Beed police)पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पुन्हा वाहनधारकांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी बीडच्या (Bus stand)बस स्टॅन्ड आणि अण्णाभाऊ साठे चौकात वाहतूक (Traffic police)पोलिसांनी सरसकट वाहनांची तपासणी सुरु केली आहे.यात लायसन्स नसणारे,फॅन्सी नंबर प्लेट,कर्कश आवाजाचे (Horn)हॉर्न,सायलेन्ससर जप्त करण्याची मोहीम सुरु असून अनेकांकडून मोठा दंडही वसूल करण्यात आला आहे.जवळपास तासापासून सुरु असलेल्या वाहतूक शाखेच्या या मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली आहे. 

Advertisement

Advertisement