Advertisement

संतोष देशमुख हत्या (murder) प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती(judicial commitee)गठीत

प्रजापत्र | Wednesday, 15/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.15 (प्रतिनिधी): संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्यासंदर्भाने आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार आता या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशीची देखील घोेषणा केली होती मात्र या संदर्भात पुढील आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला लक्ष करत होते. आता अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांची नियूक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार आहे. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीने आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे. 

 

Advertisement

Advertisement