Advertisement

बसवर दगडफेक सर्व गाड्यांच्या फेऱ्या रद्द

प्रजापत्र | Tuesday, 14/01/2025
बातमी शेअर करा

बीड : (beed)वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. (walmik karad)वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत वातावरण तापलं आहे. (parli)परळीत अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. काही भागात बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

परळीत वाल्मीक कराड समर्थकांनी सकाळपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. परळीत कराडच्या समर्थनात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. परळीत एका महिलने स्वत:ला पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. वाल्मीक कराडची ७५ वर्षीय आई आणि बायकोही सहभागी झाली. या प्रकरणावरून सकाळपासूनच वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.

परळीत कौडगाव बसवर अज्ञातांकडूनही दगडफेक करण्यात आली. परळीत डेपोतून अचानक जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव डेपोमध्ये बस लावल्या आहेत. या दगडफेकीमुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

 

Advertisement

Advertisement