Advertisement

माझ्या मुलाला न्याय द्या

प्रजापत्र | Tuesday, 14/01/2025
बातमी शेअर करा

परळी-केज पोलीस ठाण्यात (Kaij Police Station) खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या आईने आता न्यायायासाठी परळीतील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत माझ्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे.थोड्यावेळात वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
                सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण राज्यात चर्चेत आहे.यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.तत्पूर्वी सकाळपासून परळीत वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई बाबूराव कराड यांच्यासह शेकडोंनी परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडत गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली असून परळी शहर पोलीस ठाण्यात महिलांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.  

Advertisement

Advertisement