के ज दि.१३ (प्रतिनिधी)- (beed) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष (vishnu chate) विष्णू चाटे पोलीस (beed police)कोठडीत आहे. त्याला आज (दि. १३) केज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश कुणाल जाधव यांनी १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, विष्णू चाटे याने बीड ऐवजी लातूर येथील कारागृहात ठेवण्याचा अर्ज न्यायालयाला सादर केला होता. परंतु, न्यायालयाने सदर अर्ज फेटाळून लावला. त्याच बरोबर आज विष्णू साठे याला न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षाचे वकील गैरहजर होते. आरोपीच्या वतीने ॲड. सचिन शेप यांनी काम पाहिले.
बातमी शेअर करा