Advertisement

महाआघाडीचा तोडण्याचा शिवसेनेचा निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी

प्रजापत्र | Saturday, 11/01/2025
बातमी शेअर करा

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केली. राऊतांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे.

माजी खासदार प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी आपल्या सोशल अकाउंटवर याबाबतची पोस्ट करून ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या आरोपामुळे ठाकरे यांच्यासभोवताली पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी की इतर कोणत्या कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंचा वैयक्तिक फायदा कोणता, असे सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

Advertisement