Advertisement

महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे सेनेची घोषणा

प्रजापत्र | Saturday, 11/01/2025
बातमी शेअर करा

मुंबई- महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला असून (uddhav thackeray) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचं आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं तसं ठरतंय, असे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही घोषणा केली आहे. (mumbai) मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या) निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्यात आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.

 लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले तरी इंडिया आघाडीची अजून एकही बैठक झाली नाही. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील सर्वात मोठा पक्ष आहे, बैठक बोलावण्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे. मात्र, अजून एकही बैठक होऊ शकलेली नाही, अशी खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement