दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. दरम्यान, यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बातमी शेअर करा