बीड : संतोष देशमुख यांची झालेली हत्या महाराष्ट्राला आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे. पण त्यांच्या हत्या प्रकरणाआडून काही तथाकथित पुढारी चमकोगिरी करित आहेत. या प्रकरणाचा इव्हेंट करु नका, मजाक उडवू नका, चमकोगिरी थांबवा नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागीतला जात आहे. विरोधीपक्षासोबतच महायुतीचे लोकप्रतिनिधी देखील राजीनामा मागत आहेत. या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांच्याबाजुने देखील लोक समोर येत आहेत. या प्रकरणावरुन राजकारण सुरु असल्याचे सांगत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या घटनेचे राजकारण केले जाऊ नये. काही तथाकथित लोकप्रतिनिधी प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत. तिन चार ठेकेदारांनी या प्रकरणातील आरोपींना वाजविण्याची सुपारी घेतली आहे.प्रकरण दुसरीकडे वळवून मुळ आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे.सीआयडी, एसआयटी तपास करत आहेत मात्र फक्त चमकोगिरीसाठी, स्वतः च्या स्वार्थासाठी प्रकाश सोळंकेंपासून संदीप क्षीरसागरांपर्यंत धनंजय मुंडेंवर आरोप करुन स्वार्थ साधत आहेत. हेच न्यायालय बनत आहेत. या सर्वांनी चमकोगिरी थांबवावी नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु असे पोटभरे म्हणाले. धनंजय मुंडेंवर आरोप करणारांची पार्श्वभूमी काय? हेच टक्केवारीखोर, गुन्हेगार आहेत. प्रकाश सोळंकेंवर गुन्हा दाखल आहेच.आम्ही बोलणं सुरु केलं तर सोळंकेंना तोंड उघडता येणार नाही. संदीप क्षीरसागरांचा तर दहशतीचा काळाकुट्ट इतीहास आहे. आम्हाला गुण्यागोविंदाने जगु द्या. सुरेश धस माझे मित्र आहेत. त्यांनी सबुरीने घ्याव. त्यांच्याही खाली खुप मोठा अंधार. तो बाहेर काढण्याची, इतीहास सांगण्याची वेळ आणू नका. तुमचे मुंडेंसोबतचे राजकीय भांडण त्यासाठी देशमुख हत्या प्रकरणाचा वापर करु नका असेही पोटभरे म्हणाले.
प्रजापत्र | Tuesday, 07/01/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा