बीड दि.६ (प्रतिनिधी)- (beed)संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आ. सुरेश धस यांनी मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी पत्रकार परिषदेतून आ. सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले असून सुरेश धसांनी या आरोपांची उत्तरे द्यावीत असे म्हटले आहे.
अविनाश नाईकवाडे यांनी पत्रकार परिषदेतून काही लोकप्रतिनिधी (beed) जिल्ह्याची बदनामी करित असल्याचे सांगितले. आम्ही इतके दिवस शांत होतो, पण आता किती सहन करणार? (Dhananjay Munde) मंत्री धनंजय मुंडेंचे नेतृत्व संपवु पाहणारे (Suresh Dhas) आ.सुरेश धस कोण आहेत? बुट्टया गायकवाड हत्या प्रकरणातील आरोपी संजय तांबडे वापरत असलेला मोबाईल क्रमांक गायकवाड हत्या प्रकरणाच्या काही दिवस अगोदर (Suresh Dhas) सुरेश धस वापरत होते.आबासाहेब विक्रम धस (आरोपी ११) याच्याकडून ३ लाख जप्त करण्यात आले होते, त्या आरोपीचे आणि धसांचे संभाषण झाले होते, या संबंधावर आ.सुरेश धस काय बोलणार आहेत असे नाईकवाडे म्हणाले.
आ. धस गुंडगिरीवर बोलतात पण पुण्यातील गुंड निलेश घायवाळ सोबत सुरेश धस काय करित आहेत? खंडणी प्रकरणात सुरेश धसांनी ज्याचा उल्लेख केला तो नितीन बिक्कड हा सुरेश धसांचा माणूस आहे,याचही सुरेश धसांनी उत्तर द्यावं असे नाईकवाडे म्हणाले.
जरांगेंनाही केली विनंती
पत्रकार परिषदेतून अविनाश नाईकवाडे यांनी (Manoj Jarange) मनोज जरांगे यांनाही विनंती केली. मनोज जरांगे आमच्यासाठी दैवत, आजपर्यंत स्टेजवर एकटे बोलायचे, आज काय वेळ आली? तुमचे व्हिडिओ दाखविणारा मी आहे. तुमच्यासाठी फुलं वेचणारा मी आहे. पण तुमच्या तोंडातून हिंसेची भाषा योग्य नाही. मराठा समाजाला हिंसेकडे नेऊ नका असे नाईकवाडे म्हणाले.