Advertisement

बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा

प्रजापत्र | Monday, 06/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी)- परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत, बीडमध्ये आंबेडकरवादी संघटनेच्यावतीने, संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचे आयोजन आज (दि.६) सोमवार रोजी करण्यात आले आहे. या मोर्चाला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून, सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येस जबाबदार पोलीसांवर गुन्हे दाखल करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करा, परभणी येथील महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करा, देशातील सर्व निवडणूका मतपत्रिकेवर घ्या, शासकिय नोकरीतील गुत्तेदारी पध्दती रद्द करुन कायमस्वरुपी नौकरी द्या व रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरीत भरा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी भारत सरकार शिष्यवृत्ती दरमहा वेळेवर द्या, शासकिय सेवेतील आरक्षणामधील वर्गीकरण कायदा रद्द करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा. या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये विविध फलक पाहायला मिळत आहेत.

Advertisement

Advertisement