Advertisement

बसने तीन दुचाकींना चिरडले

प्रजापत्र | Sunday, 05/01/2025
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.५ (प्रतिनिधी)- (dharur)शहरात सायंकाळी चारच्या सुमारास धारुर आगाराच्या बसने (Bus accident) नवीन चारचाकीसह तीन दुचाकींना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कसलीही जिवितहानी झाली नाही.

 अधिक माहिती अशी की, (dharur) शहरातील एका तरुणाने नवीन गाडी आणली. सदर गाडी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्याच्या कडेला उभी होती. नवीन गाडी पाहण्यासाठी त्यांचे मित्र आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून पाहणी करत असताना धारुरकडे येत असलेल्या धारुर आगाराची बस (क्र.एम.एच. २० बी.एल. २९३०) चालकाचे नियंत्रण सुटले. या भीषण अपघातात चारचाकीसह उभ्या असलेल्या होंडा, बुलेट व एका दुचाकीला बसने चिरडले. सुदैवाने गाडीमध्ये बसलेले पाच मित्र या अपघातात बालंबाल बचावले. या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले. 

Advertisement

Advertisement