Advertisement

 महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत शिर्डीतील मोफत जेवण बंद करा

प्रजापत्र | Sunday, 05/01/2025
बातमी शेअर करा

शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिलं जातं. मात्र, आता साई संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. तसेच मोफत जेवणासाठी जे पैसे दिले जातात ते पैसे मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केले जावेत, अशी मागणीही सुजय विखे यांनी केली आहे. तसेच ‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय, संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’, असं विधानही सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

‘महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत’
“साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो. मात्र, जेवणासाठी २५ रुपये घेतले पाहिजेत. जेवणासाठी पैसे घेतले पाहिजेत. तो पैसा वाचेल तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे. संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत. हे योग्य नाही. संस्थानने आपण काय करत आहोत? याचा विचार केला पाहिजे”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement