Advertisement

आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू बेपत्ता

प्रजापत्र | Sunday, 05/01/2025
बातमी शेअर करा

पिंपरी : नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे, असे सांगून परळी तालुक्यातील दैठणा घाट या आपल्या मूळ गावावरून निघालेला आ.रत्नाकर गुट्टे यांच्या सख्ख्या भाचीचा मुलगा पिंपरी-चिंचवड शहरातून बेपत्ता झाला. पिंपळे निळख येथील रक्षक चौकात गुरुवारी (२ जानेवारी) ही घटना घडली.सुमित भागवत गुट्टे (वय २४, रा. दैठाणा घाट, ता. परळी, जि. बीड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुमित यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुमित याचे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. पाच ते सहा दिवसांपूर्वी तो गावावरून पिंपरी-चिंचवड येथे आला. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे, असे सांगून तो गावावरून शहरात आला होता.दोन दिवस तो आळंदी येथे राहिला. त्यांनतर गुरुवारी सकाळी तो रक्षक चौक येथे आला. मात्र, तेथून तो बेपत्ता झाला. त्याचा फोनही त्यांनतर बंद येत आहे. शुक्रवारी तो पुणे स्थानकावर दिसून आला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

.

Advertisement

Advertisement