मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून महायुतीला लोकांनी बहुमत दिले. 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या. सुरूवातीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच बघायला मिळाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी खुलासा करत म्हटले की, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नाहीये. एकीकडे संजय राऊत हे महायुतीवर जोरदार टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे दैनिक सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचे नुकतच अभिनंदन करण्यात आले.
आता याबद्दल बोलताना आता संजय राऊत हे दिसले आहेत. संजय राऊत म्हणाले की, दैनिक सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहिले आणि त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात जवळीक साधण्याचा प्रश्नच येत नाही. नक्षलवादामुळे सामान्य माणसांचे बळी गेले. दैनिक सामन्यातून आम्ही संवाद साधला. विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात सतत संवाद सुरू असतो. राज्याच्या हिताचे पाऊल उचलले असेल तर काैतुकच. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट ही शिष्टाचार होती.
पुढे राऊत म्हणाले, गडचिरोलीचा विकास हा स्वागतार्हच. आधीच्या पालकमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये खंडण्या वसूल केल्या. गडचिरोली आणि चंद्रपूर सुवर्ण भूमी आहेत. गडचिरोली ही पोलाद सिटी होणे हे राज्याच्या हिताचे आहे. मोदींनी चांगले काम केले, त्यावेळी त्यांचेही काैतुक केले. गडचिरोलीमध्ये विकासाची गंगा येणार असेल तर काैतुकच. देवेंद्र फडणवीस हे बीडमधील बंदुकीचे राज्य मोडून काढतील याची खात्री असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, नक्षलवादासोबतच मराठी विरोधही मोडून काढा. मराठी आणि अमराठी वादाला भाजपा जबाबदार आहे. ज्यापद्धतीने तुम्ही गडचिरोलीचा नक्षलवाद मोडून काढणार आहात. त्याच पद्धतीने मराठी विरोधही मोडून काढा. सामनातून देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. अखेर सामन्यातून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन का करण्यात आले, याबद्दल बोलताना संजय राऊत हे दिसले आहेत. बीडबद्दलही बोलताना संजय राऊत हे दिसले.