सोलापूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. यावेळी स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या झालेल्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.यात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन गाणगापूरला जातं असतांना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे अवचित्य साधून राज्यातील कित्येक लोक देवदर्शनासाठी जात असतात. आजही संपूर्ण राज्यात प्रमुख देवस्थानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतल्यावर गाणगापूर येथे जातांना हा अपघात झाला.
सर्व भाविक हे नांदेड जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. अक्कलकोट पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात दाखल आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.