पुणे - मराठी अभिनेत्री (Prajakta Mali) प्राजक्ता माळीने भाजप आ.सुरेश धस यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. (Suresh Dhas ) धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळी आणि इतर काही अभिनेत्रींची नावे घेतली, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. या वक्तव्यावर प्राजक्ताने संताप व्यक्त करत धस यांच्याकडून जाहीर माफीची मागणी केली आहे.२८ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत प्राजक्ताने आपली भूमिका स्पष्ट केली. तिने सांगितले की, महिलांबाबत अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचेही तिने जाहीर केले.प्राजक्ताच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, तक्रारीचा सखोल अभ्यास केला जाईल आणि आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अपमानासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, "संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारांमुळे त्या सर्व क्षेत्रांमध्ये सक्षमपणे काम करत आहेत. मात्र, महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणि अपमानास्पद वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत. समाज माध्यमांवर महिलांवर अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल."