Advertisement

ॲड.प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात तासभर चर्चा

प्रजापत्र | Saturday, 28/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा (Prakash Ambedkar) ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.२८) मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तासभर चर्चा झाली. बैठकीत परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यु या विषयांवर चर्चा झाली. या संदर्भातील माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान परभणी हिंसाचार प्रकरणासंदर्भात चर्चा केली. पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत ही किरकोळ असून, त्यांना एक कोटींची भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.

 

 

'या' मागण्या मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्य केल्या
पुढे ॲड. आंबेडकर यांनी परभणी प्रकरणात चौकशी करून ज्यांनी निरपराध नागरिकांना क्रूरपणे मारहाण केली आहे. अशा पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदवली गेली पाहिजे, अशी मागणी (Devendra Fadnavis)मुख्यमंत्र्यांकडे केली ती मागणी त्यांनी मान्य केली आहे.
(Prakash Ambedkar) आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थांच्या DBT संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

Advertisement

Advertisement