Advertisement

लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून १५०० रूपये जमा होणार

प्रजापत्र | Tuesday, 24/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. मात्र आता अधिवशेन संपताच याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे.

 

 

लाडकी बहीण योजनेत ३५ लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेसाठी ३५०० कोंटीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे

लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. आता सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. यातच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहि‍णींना १५०० की २१०० रुपये मिळणार? हे देखील स्पष्ट होत नव्हते त्यामुळे ‘लाडक्या बहि‍णी’मध्येही संभ्रम असल्याचं पाहायला मिळत होते.

 
 

Advertisement

Advertisement