Advertisement

 शरद पवारांचे पुण्यातील एकमेव आमदार अजित पवारांच्या भेटीला

प्रजापत्र | Monday, 23/12/2024
बातमी शेअर करा

पुणे : राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा 5 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.  वडगाव शेरी मतदार संघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्रा आता वडगाव शेरीचे विद्यमान आमदार बापू पठारे वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे.

बापू पठारे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात ही भेट असल्याची आणि त्या अनुषंगाने चर्चा केल्याची पठारे यांनी माहिती दिली आहे. तर भेटीत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठारेंनी दावा केला आहे. पुण्यातून शरद पवारांचे एकमेव आमदार बापू पठारे आहेत. मात्र या भेटीत नेमकं काही खालबत झाले असल्याच्या उलट सुलट चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Advertisement

Advertisement