Advertisement

कार- कंटेनरचा भीषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 21/12/2024
बातमी शेअर करा

सांगली- कर्नाटकातील बंगळूरजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सांगलीतील जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये चंद्रम इगाप्पागोळ, धोराबाई इगाप्पगोळ, गण इगााप्पगोळ, आर्या इगाप्पागोळ, विजयालक्ष्मी इगाप्पागोळ यांचा समावेश आहे.

चंद्रम इगाप्पागोळे हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवासी आहेत. ते एकाच सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच इगाप्पागोळ कुटुंबीय ख्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते. यावेळी बेंगलोरजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एकच कुटुंबातील सर्वांचा जागीच मृत्यु झाला आहे.

Advertisement

Advertisement