Advertisement

राहुल गांधी सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर

प्रजापत्र | Saturday, 21/12/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी (दि.२३) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. परभणी येथे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर १० जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावामध्येही राहुल गांधी येणार आहेत.

 

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) परभणी दौऱ्यावर येणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत, अशी माहिती काँग्रेस मधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी पुढच्या महिन्यात १० जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावालाही भेट देणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर निवडणुकीच्या निकालावरून मारकडवाडीमध्ये झालेले आंदोलन देशभर चर्चेचा विषय ठरले आहे. याची दखल विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी घेतली होती, त्या गावातही राहुल गांधी जाणार आहेत.

Advertisement

Advertisement