Advertisement

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही

प्रजापत्र | Friday, 20/12/2024
बातमी शेअर करा

 मुंबई- राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही सूरु असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मी शब्द जपून वापरत आहे. राज्याचे वातावरण खराब केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना आमचा आवाज बंद करायचा असल्याचेही राऊत म्हणाले. 

खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर बोलतानवा राऊत म्हणाले की, माझा पोलिसांवर विश्वास आहे. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांच्याकडून तपास सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. 

Advertisement

Advertisement