किल्लेधारुर दि.२२ (प्रतिनिधी)- धारुर तालुक्यातील मौजे पहाडी पारगाव शिवारात शेतकरी बालासाहेब अंडील यांच्या शेतामधून गेलेल्या वीजेच्या तारा तुटून शेतात पडल्यामुळे शेतातील अंदाजे ६० टन ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शेतकरी बाळासाहेब अंडील यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला आहे.
तहसीलदारांना केलेल्या निवेदनात, पहाडी पारगाव शिवारात गट नंबर २६, २७ मध्ये ३५ आर. जमीन असून सदर क्षेत्रात १३ जानेवारी २०२० रोजी ऊस पिकाची लागवड केली होती. सदर गट नंबर मधून वीज वितरण कंपनीची वीजेची लाईन गेलेली आहे. सदर गट नंबर मध्ये १६/०१/२०२१ वार शनिवार रोजी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास सदरील लाईंनच्या तीन तारा मधील तार तुटून पडल्यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ६० टन उस जळाला आहे. यामुळे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून सदरील नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी मागणी शेतकरी बाळासाहेब अंडिल यांनी धारूर तहसीलदार यांच्या कडे केली. याबाबत पोलिस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा