नागपूर -उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर, ही दोघांमधली पहिलीच भेट ठरली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. ही सदिच्छ भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे थेट नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले. या भेटीदरम्यान, ७ मिनीटात काय चर्चा रंगल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे पोहचल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.