नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना "लाडक्या बहिणींना २१०० रुपये त्वरित द्यावेत" अशी मागणी केली.
"निकष बाजूला ठेवा, आवडती-नावडती करू नका"
उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या विजयाचे फटाके कमी आणि नाराजीचे बार जास्त वाजत आहेत. लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी लाडके-नावडते आमदार चर्चेत आहेत. सरकारने २१०० रुपये त्वरित वाटप करावेत, निकष बाजूला ठेवून सर्व बहिणींना समान लाभ मिळावा."
महायुती सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, "हे सरकार आवडती-नावडती करत आहे. पैसे देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये."
बातमी शेअर करा