नागपूर - महायुती सरकारचा नागपूमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मंचावर उपस्थिती आहे. तसेच जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांचीही मंचावर उपस्थिती आहे.पंकजा मुंडे यांनी महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली.
मराठवाड्यातील नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांना विधांपरिषदेवर संधी दिली. विधांपरिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. त्यात, भाजपने तब्बल १३२ जागांवर उमेदवार जिंकत मोठा विजय मिळवला. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने त्यांचा सन्मान ठेवला आहे. तर, पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, त्यांच्या समर्थकांनीही जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.