मुंबई- विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? यावरून आता विरोधक अनेक सवाल उपस्थित करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारवर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून खोचक टीका केली आहे. महायुतीत मलईदार खात्यांसाठी भांडणं सुरु आहेत. मलईचं खातं कोणाला मिळेल? फक्त यासाठी सरकार काम करत असल्याचा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.
बातमी शेअर करा