मुंबई-सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही झाली. मात्र आता धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. या महिलेने मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपकडून धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आले होते. परंतु आता बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच तक्रार मागे घेणाऱ्या महिलेवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली. 'अशाप्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. सरकारी यंत्रणांचा बराच वेळ या प्रकरणात गेला. अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचे वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीनवही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा', अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
बातमी शेअर करा