मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पदमुक्त करावं अशी मागणी पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं केली आहे. त्यामुळं प्रदेश काँग्रेसला नवं नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नाना पटोले यांनी पदमुक्त करण्यासाठी मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं आहे. यात ते म्हणतात की, "आता चार वर्ष झाली, जबाबदारीतून मुक्त करा. प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करुन नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची भूमिका पार पाडा"नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आजवरचा सर्वात मोठा पराभव झाला आहे. त्यांना केवळ १६ जागाच मिळाल्या. या परभवाची जबाबदारी घेऊन पटोले जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करत आहेत.
विधानसभा निकालानंतर लगेचच नाना पटोले राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण आपण राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर या चर्चा थांबल्या मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे.