मुंबई - राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Govt) स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यानंतर आता मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याची राजकीय वर्तुळात जोरजार चर्चा सुरु आहे. याबाबात प्रतिक्रिया देताना राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय. सत्ता मिळाल्यावर सगळे वाद मिटतात. भाजप जे सांगेल ते त्या दोन पक्षाला मान्य करावं लागेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
बातमी शेअर करा