दिल्ली-आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. दिल्ली सरकारने दिलेला शब्द पाळत महिला सन्मान निधीला मंजुरी दिल्याची घोषणा केजरीवाल यांनी गुरुवारी केली. विधानसभा निवडणुकीच्या आधी केजरीवालांचा हा मास्टरस्ट्रोक ठरला आहे. भाजप महायुतीने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानं निवडणुकीत याचा मोठा फायदा झाला होता. आता केजरीवाल यांनी याच धर्तीवर महिला सन्मान निधी योजना जाहीर केलीय.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, महिला सन्मान निधींतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला एक हजार रुपये येतील. माझ्या माता आणि भगिनींसाठी ही योजना असल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.
दिल्लीत आतिषी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात दिल्लीतील प्रत्येक महिलेच्या खात्यावर दर महिन्याला एक हजार रुपये जमा केले जातील. ही योजना लागू झाली आहे. महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी करावी लागणार आहे. ज्या महिला नोंदणी करतील त्यांच्या खात्यात महिन्याला प्रत्येकी हजार रुपये मिळतील असं केजरीवाल यांनी सांगितलं.