बीड दि.२३ (प्रतिनिधी): राज्यभरात महायुतीचा गाजावाजा असून बीड जिल्ह्यात सहा पैकी महायुतीला पाच जागा मिळाल्या आहेत. मात्र
बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर पाच हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले तर परळीतून धनंजय मुंडे यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले आहे.
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये थेट लढत झाली. बीड मतदार संघाकडे सर्व राज्याचे लक्ष लागेल होते मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार आ.संदीप क्षीरसागर हे पाच हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. तर महायुतीचे पाच उमेदवार निवडून आले. गेवराईमधून विजयसिंह पंडित, माजलगाव मधून प्रकाश सोळंके,परळीमधून धनंजय मुंडे,केजमधून नमिता मुंदडा,आष्टीमधून सुरेश धस यांनी बाजी मारली. बीड जिल्ह्याचा कौल मात्र महायुतीलाच हे स्पष्ट झाले आहे.
बातमी शेअर करा