Advertisement

आता अण्णा हजारेही लावणार विडिओ.......!

प्रजापत्र | Thursday, 21/01/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे/केज

पारनेर दि.२१ - कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकारनं यावर कोणताच तोडगा काढला नाही. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे  'व्हिडिओ’च्या माध्यमातून आजपासून जनजागृती सुरु करणार आहेत.

          अण्णा म्हणाले की, “२०११ मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठवलं त्याचं उत्तरही दिले जात नाही. त्यामुळं भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे आणि कौतुकाचे व्हिडीओ जनतेला दाखविणार आहे.”

                  स्वामीनाथन आयोगाप्रमाणं शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या, अशी मागणी करीत अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार असल्याची माहिती अण्णांनी राळेगण सिद्धी येथे दिली.

           दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह  आणि अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन यांच्यासह नऊ प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ असून ते सोशल मीडियावर पाठवले जाणार आहेत.

Advertisement

Advertisement