Advertisement

सोयाबीनमधील फसवणुकीवर काय म्हणाले कृषी मंत्री ?

प्रजापत्र | Monday, 22/06/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात सोयाबीन न उगवण्याच्या मोठ्याप्रमाणावर तक्रारी आल्या आहेत, याची सविस्तर चौकशी करण्यात येईल आणि यात जे कोणी दोषी असतील त्य्नाच्यावर कठोर कारवाई करू, कोणाचीही गय केली जाणार नाही असे राज्याचे  कृषी मंत्री दादा भुसे यांनी 'प्रजापत्र'शी बोलताना सांगितले. 

नेमकं काय म्हणाले दादा भुसे ? व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 
https://youtu.be/YnqbRKWgN3E

औरंगाबाद जिल्ह्यात स्टिंग करून बीड जिल्ह्यात आलेल्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी 'प्रजापत्र ' शी संवाद साधला. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत कृषी मंत्र्यांनी 'या प्रकरणात तातडीने सविस्तर चौकशी करायला सांगितले आहे. अधिकारी संबंधित बियाणांचे नमुने घेतील , त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल आणि जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करू. अगदी कोणीही दोषी असला तरी त्याला सोडणार नाही ' असे सांगितले. या चौकशीला वेळ लागेल , मात्र तपोर्यंत बाजारातील बोगस बियाणाची विक्री होऊ नये यासाठी एक तातडीचा अहवाल दोन दिवसात मागवू आणि ज्या कंपन्यांबद्दल प्रथमदर्शनी दोष दिसत असतील त्यांना विक्री बंद चे आदेश तात्काळ देण्यात येतील तशा सूचना आपण अधिकाऱ्यांना देऊ असेही कृषी मंत्री म्हणाले. 
पीक कर्ज द्यावेच लागेल. 
बँक पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रे मागत आहेत याबद्दल बँकांनी शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवावी, स्वतः मुख्यमंत्री याबाबत रिझर्व्ह बँकेशी देखील बोलले आहेत, पण बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्यावे असे मंत्री भुसे म्हणाले . 

Advertisement

Advertisement