Advertisement

ठाकरे सरकार फक्त "या" गोष्टीत नंबर वन - भातखळकर

प्रजापत्र | Wednesday, 20/01/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.20 -  16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोणत्या राज्यानं आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन, असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

                   भातखळकर म्हणाले की, “कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत ठाकरे सरकारचा क्रमांक 8 वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन.”

        दरम्यान अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केंद्र सरकारची एक यादी जाहीर केली आहे. त्यात 19 जानेवारी 2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशभरातील कोणत्या राज्यात किती लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे याची माहिती यात देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement