Advertisement

आता ड्रॅगन फ्रूट नाही 'कमलम' म्हणा! भाजप सरकारने शहरांनंतर आता फळाचंही नाव बदललं

प्रजापत्र | Wednesday, 20/01/2021
बातमी शेअर करा

अहमदाबाद: जगभरात ड्रॅगन फ्रूटच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फळाला गुजरातमध्ये नवीन ओळख मिळाली आहे. गुजरात सरकारने  ड्रॅगन फ्रूटला 'कमलम' असे नाव दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी  यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'सरकारने ड्रॅगन फ्रूटच्या नावात बदल करुन 'कमलम' नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.'
मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, 'राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या फळाचा बाह्य आकार कमळासारखा आहे. म्हणून त्याचे नाव बदलून 'कमलम' असं ठेवण्यात आलं आहे.' रुपाणी यांनी पुढे अशी प्रतिक्रिया दिली की, 'चीनशी संबंधित असलेल्या ड्रॅगन फ्रूटचे नाव आम्ही बदलेले आहे. संस्कृतमध्ये कमलमचा अर्थ कमळ असा होतो. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले ड्रॅगन फ्रूट अनोख्या रुपात आणि चवीने उष्णकटिबंधीय फळ आहे.', असे ते म्हणाले.

फलोत्पादन विकास अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'आम्ही ड्रॅगन फ्रूटचं पेटंट 'कमलम' या नावाने करण्यासाठी अर्ज केला आहे. पण  गुजरात सरकारने निर्णय घेतला आहे की या फळाला यापुढे कमलम असं म्हटलं जाईल.'

Advertisement

Advertisement