Advertisement

बीडमध्ये १३९ पैकी १३२ अर्ज वैध

प्रजापत्र | Wednesday, 30/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी)- बीड विधानसभा मतदार संघातून दि.२२ ऑक्टोबर ते दि.२९ ऑक्टोबरपर्यंत ९५ उमेदवारांनी १३९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज सकाळपासून येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज छाणणीची प्रक्रिया सुरू होती.

 

 

दुपारपर्यंत झालेल्या छाणणीनमध्ये १३९ पैकी १३२ अर्ज वैध ठरले असुन सात अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणूक विभागाकडून दुपारी उशिरापर्यंत वैध अर्जाची यादी निश्चित करण्याचे काम सुरू होते. उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आ.संदीप क्षीरसागर, जयदत क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, ज्योती मेटे, सारिका क्षीरसागर, अनिल जगताप, फारूक पटेल, अॅड. शफीक शेख,शेख निजाम,
सी.ए. जाधव, उबाळे, गलधर, मुसा खान, चौधरी, तावरे, पुजा मोरे, करूणा मुंडे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान करूणा मुंडे यांनी परळी आणि बीड या दोन्ही मतदार संघातून अर्ज भरले होते. त्यापैकी परळी मतदार संघातील त्यांचा अर्ज अवैध ठरला असुन बीडमध्ये मात्र वैध ठरला आहे. दुपारी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement