मुंबई/ नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड अलीकडेच हायकमांडने केली, त्यापाठोपाठ आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहे. याचदरम्यान महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तानूसार, पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदीच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल
प्रजापत्र | Tuesday, 19/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा