Advertisement

वर्‍हाडाची गाडी पलटली, 20 जखमी

प्रजापत्र | Monday, 18/01/2021
बातमी शेअर करा
आष्टी : नगर-बीड महामार्गावर कडा नजीक वर्‍हाडाची गाडी पलटी झाल्याने 20 जण जखमी झाले ही घटना सामेवारी सायंकाळी 8 च्या सुमारास घडली.
कल्याण येथून जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नाचे वर्‍हाड ट्रॅव्हल्समधून आले होते. लग्न उरकून वर्‍हाड परत जात असताना सायंकाळी 8 च्या सुमारास कर्डीले वस्तीवर ट्रॅव्हल्स पलटी झाली यात 20 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. जखमींना रुग्णालयात पोेहचविण्यासाठी तात्या ढोबळे, संपत सांगळे, बंटी गायकवाड, गणेश चोरडीया, संभाजी ढोबळे, रघुनाथ कर्डीले, जयेश कदम यांनी प्रयत्न केले.
 दरम्यान रस्त्यावरच ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने दोन तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक थांबली होती.

Advertisement

Advertisement