Advertisement

चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत यांच्यासह सात आमदारांनी घेतली शपथ

प्रजापत्र | Tuesday, 15/10/2024
बातमी शेअर करा

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याच्या काहीच तासांआधी राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांच्यासह पोहरादेवीचे महंत बाबूसिंह महाराज राठोड, पंकज भुजबळांचाही समावेश आहे. महायुतीकडून 12 पैकी सात आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे राजकीय गणित लक्षात घेऊन या सात जणांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.  

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर या 7 आमदारांचा शपथविधी मंगळवारी दुपारी 12 वाजता विधिमंडळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामध्ये भाजपला तीन, तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्यात.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे

 

 

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे

  • चित्रा वाघ (भाजप)
  • विक्रांत पाटील (भाजप)
  • बाबूसिंग महाराज राठोड (भाजप)
  • मनीषा कायंदे (शिंदे गट)
  • हेमंत पाटील (शिंदे गट)
  • पंकज भुजबळ (अजित पवार गट)
  • इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)

Advertisement

Advertisement