बीड-काल बीड जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.मात्र शुक्रवारी (दि.९) बीडमधील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली.दोघे पॉझिटीव्ह कारंजा रोडवरील रहिवाशी आहेत.
शुक्रवारी ७६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यातील ७४ अहवाल निगेटिव्ह आले असून दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये ४१ वर्षीय पुरुष (छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड) व ३३ वर्षीय महिला (छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड) यांचा समावेश आहे.
माळेगावला दिलासा
दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह हे बीड शहरामध्ये आढळून आल्याने केज तालुक्यातील माळेगावला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.मागील तीन दिवसापूर्वी येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता.तर तिच्या अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यामुळे आता त्यांच्या संपर्कतील इतरांना लागण झाली का हे अहवालानंतर समोर येणार होते. सायंकाळी केजचे ३० ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.