Advertisement

लाडक्या बहि‍णींना पुन्हा मिळणार ३००० रुपये

प्रजापत्र | Tuesday, 01/10/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.०१ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही कऱण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत. बीडमध्ये आज (AJIT PAWAR) अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनासंदर्भा मोठं वक्तव्य केलेय. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहि‍णींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य (beed) बीडमध्ये अजित पवार यांनी केलेय. त्यामुळे दिवाळीच्या आधी (Ladaki bahin) लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
 

Advertisement

Advertisement