Advertisement

मोकाट कुत्र्यांनी घेतला चिमुकल्याचा बळी

प्रजापत्र | Tuesday, 29/09/2026
बातमी शेअर करा

​अंबाजोगाई दि.२९(प्रतिनिधी):शहरातील रोशन कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सहा वर्षीय चिमुकला फरहान आस मोहम्मद कुरेशी याने आज उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

  अंबाजोगाई शहरातील​ रोशन कॉलनीत राहणाऱ्या फरहानवर काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.त्याच्यावर सुरुवातीला अंबाजोगाईत आणि प्रकृती अधिकच खालावल्याने लातूर येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले.मात्र, दुर्दैवाने मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज आज अपयशी ठरली आणि या निष्पाप बालकाने जगाचा कायमचा निरोप घेतला.

 

Advertisement

Advertisement